डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्मशानभूमींची स्वच्छता

999

शशीकांत दळवी,पनवेल

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने रविवार 24 मार्च व 25 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गावातील स्मशानभूमीचे स्वच्छता अभियान करण्यात आले आहे. यावेळी कोप्रोली येथील स्मशानभूमीची साफ सफाई करून श्री सदस्यांनी जवळ जवळ एक टन कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लाऊन स्मशानभूमी स्वच्छ केली आहे. डॉ नानासाहेब धर्माधिकीरी प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेली स्वच्छता अभियानात श्री सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.