तीन मुली झाल्याने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न

1380

अनिल चौधरी, पुणे

२८ वर्षीय विवाहित महिलेने एका पाठोपाठ तिन्ही वेळेस मुलीनां जन्म दिल्याच्या कारणावरून तिला शिवीगाळ करून, हाताने मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटून जखमी करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अनिल रामनयन भारती रा.बोल्हाईमळा,जाधववाडी चिखली याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात २८१/२०१९ स्त्री अत्याचार भां.द.वि ४९८(अ), ३२३, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.या संदर्भात संबंधित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  याबाबतची अधिक माहिती अशी कि, २४ मार्च रोजी महिला तिच्या घरी नांदत असताना यातील आरोपी अनिल भारती याने प्रापंचिक वादातून  तसेच महिलेस एकापाठोपाठ तीन मुली झाल्याने त्रास देत होता. घटनेच्या दिवशी तीसऱ्याही मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून त्याने महिलेस शिवीगाळ व हाताने मारहाण केली; तिचे डोके भिंतीवर आपटून तिला जखमी केले.तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा शाररीक व मानसिक छळ केला.यावरून महिलेने चिखली पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुगे करत आहेत.

 एकीकडे मुली आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.त्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत,असे असताना लोकांची मानसिकता बदलण्याची तीव्र गरज आज निर्माण झाली आहे. आजही समाजात मुंलीचा जन्मदर हा कमीच आहे.त्याबाबत लोकांच्या विचारात जागरूकता आणणे गरजेचे झाले आहे. अशा घटनांमुळे स्त्री अत्याचार किती फोफावलाय  हे विदारक चित्र पहायला मिळत आहे.