कोंढव्यातील मनपा शाळेला स्वच्छाग्रही शाळा म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार

1517

गणेश जाधव, कोंढवा प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेच्या  कोंढवा बुद्रुक येथील 174 बी शाळेला स्वच्छाग्रही शाळा म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. शाळेचे सहशिक्षक विशाल शिरसागर यांच्या अथक प्रयत्नांनी स्पार्क नावाची “शॉर्ट फिल्म ” स्वच्छता संदर्भात तयार करण्यात आली.या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी प्रबोधन करून एक सामाजिक संदेश देण्याचे काम सदर उपक्रमातून लोकांपर्यंत पोचवण्यात आला तसेच या शॉर्ट फिल्म करिता शाळेचे विद्यार्थी ,शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यापूर्वी शाळेने राजीव गांधी प्राणीसंग्रहालय (1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर) यांच्यामार्फत साजरा केला जाणारा वन्यजीव सप्ताह या वन्यजीव सप्ताहात स्वच्छतेवर आधारित ये “कुडे की समस्या” यावर पथनाट्य सादरीकरण करून तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु स्पर्धेत देखील अनेक पारितोषिके प्राप्त केली .

या शाळेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे .शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत. राज्यस्तरीय पुरस्काराच्या माध्यमातून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला .उत्कृष्ट अशी SPARK शॉर्ट फिल्म आणि”कुडे की समस्या “यावर उत्तम असे पथनाट्य सादरीकरणामुळे तसेच विद्यार्थ्यांचे छान विचारांचे निबंध या सर्व गोष्टींमुळे आज हा पुरस्कार प्राप्त झाला असे शाळेचे मुख्याध्यापक सौ सुप्रिया निगडे यांनी सांगितले.सदर स्पर्धेसाठी शाळेचे शिक्षक सौ.पुनम राजगे , प्रवीण पोटे ,सुरज अवतारे यांनी मुलांच्या प्रयत्नांना जोड दिली.. पुणे महानगरपालिका घनव्यवस्थापन चे प्रमुख माधव जगताप ,सहाय्यक आयुक्त अरुण खिलारे ,स्वच्छग्रही संस्थेचे संस्कृती मॅडम,अविनाश सर यांच्याकडून पुरस्कार व सन्मानचिन्ह प्राप्त झाला. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ,पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले .