भूषण गरुड
पुणे रेल्वे एसटी स्टँड समोरील रोडवर दुचाकी वाहनाची संशयितरित्या टेहाळणी करत असल्याचे आढळून आला असता. गुन्हेशाखेच्या युनिट 2 ने नोयल एेलन शबान(वय 19, रा.क्वीन्स गार्डन, सर्किट हाऊस जवळ) जागीच ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करून पोलिस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला असता. त्याच्याकडून चोरी केलेल्या 6 दुचाकी गाड्या (किंमत रु. 2 लाख 40 हजार) हस्तगत करण्यात आल्या. त्याचा सखोल तपास केला असता त्याने 2 वर्षापूर्वी कोरेगाव पार्क रेल्वे ओव्हरब्रिज खाली एका इसमाचा खून केलाच्या गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात होणाऱ्या वाहन चोरीला आळा काढण्याकरिता पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे युनिट – 2 गुन्हे शाखेतील पोलीस नाईक यशवंत खंदारे, मोहसिन शेख, राकेश खूणवे दि.18 मार्च रोजी पेट्रोलिंग करीत असताना. पुणे रेल्वे एसटी स्टँड समोर रोडवर दुचाकी वाहनाची संशयितरित्या टेहाळणी करीत असल्याचे आढळून आले असता. नोयल शबान याला जागी ताब्यात घेऊन युनिट कार्यालयात आणून चौकशी केली असता. तो चौकशीत सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला बंडगार्डन पोलीस ठाणे मध्ये अटक करून दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलिस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला असता. त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदीवासी प्रशिक्षण संस्थेच्या सीमाभिंतीचे बाजुने मोकळ्या जागेत झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या एकूण 6 चोरी केलेल्या दुचाकी गाड्या(किंमत रु. 2 लाख 40 हजार) हस्तगत केल्या. सदर गाड्या त्याने बंडगार्डन 2, येरवडा 2, चतुर्श्रुंगी 1, खडकी 1 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडे पोलिस कस्टडी रिमांड मध्ये आणखीन तपास सखोल तपास करीत असताना. त्याने दि.3 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3.15 सुमारास रेल्वेत चोरी करणारा जोडीदार सुरज रवी नादर(वय 20, रा. शिवाजी नगर पाटील इस्टेट) याने रेल्वेत बॅक चोरलेली होती व त्यात मिळालेले पैशाची वाटणी करताना आरोपीस व्यवस्थित वाटा न दिल्याने त्याच्यांत त्यावरून कोरेगाव पार्क रेल्वेओव्हर ब्रिज खाली भांडणे झाली. त्यात आरोपी नोयल याने सुरज नादरला मारहाण करून त्याचे डोके रेल्वे पटरीच्या कट्ट्यावर जोराजोराने आपटून त्याला जीवे ठार मारून खून केला असल्याचे कबूल केले. अशाप्रकारे दोन वर्षापूर्वी झालेल्या खुनाला वाचा फोडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर कामगिरी प्रदीप देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त पुणे, शिरीष सर्देशपांडे पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, समीर शेख सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचना प्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, जयंत जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार संजय दळवी, अनिल कुसुरकर, शेखर कोळी, पोलीस हवालदार अजय खराडे, विनायक जाधव, पोलिस नाईक यशवंत खंदारे, मोहसीन शेख, राकेश खुणवे, विवेक जाधव, चंद्रकांत महाजन यांनी कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.