अल्पवयीन मुलीचे अश्लील चित्रण सोशल मिडीयावर टाकण्याऱ्यास अटक

1046

मल्हार न्यूज नेटवर्क :-

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्यांचे एकांतातील फोटो फोटो युट्युब वर टाकण्याऱ्या आरोपी देवा महादेव जमादार वय-२२ वर्षे धंदा- ड्रायव्हर, रा.मु.पो.एकगा, ता.उमरगा जिल्हा उस्मानाबाद सध्या रा.भोसरी याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात २८०/१९  स्त्री अत्याचार, भां.द.वि.३५४,५०६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण २०१२चे कलम ११,१२ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७(ब) नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या भावाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर म्हणाले, अल्पवयीन मुलगी १६ वर्षांची आहे. आरोपी देवा जमादार हा संबंधित मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असूनसुद्धा तिचा वारंवार पाठलाग करायचा, त्यातून त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले.तो तिच्याशी अश्लील बोलायचा . हि गोष्ट मुलीच्या घरी कळल्यावर मुलीच्या आईने आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपी देवा जमादार याने मुलीच्या आईस धमकी देऊन पिडीत अल्पवयीन मुलीचे आणि त्याचे एकांतातील  फोटो युट्युब वर टाकून मुलीच्या मनास लज्जा निर्माण होईल अशी कृती करून लहान मुलांचे चित्रण करून ते इलेक्ट्रोनिक माध्यमांवर पाठविले . त्यामुळे त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.  

   याबाबतचा अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.