हड़पसर कलाकारांनी दिला रंगपंचमी कार्यक्रमातून मतदान जागृतीचा संदेश

766

हडपसर प्रतिनिधी,

हड़पसर परिसरातील सर्व कलाकारांनी सावली फौंड़ेशन ससाणेनगर येथे रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन केले होते धकाधकीच्या आयुष्यातून तणावमुक्त होण्यासाठी व सर्व जण एकत्रित यावेत म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास नगरसेवक योगेश ससाणे,ड़ाॅ.शंतनु जगदाळे,अजय न्हावले,दत्ता दळवी,नितीन कोंढाळकर,अश्विनी सुपेकर,पदमाताई ससाणे,सुशीला गुंजाळ,दिपालीताई कवड़े,राकेश वाघमारे,प्रशांत सुरसे हे मान्यवर ऊपस्थित होते
या वेळी रंगपंचमीचा हा सण संगीताच्या तालावर मनसोक्त नाचून साजरा करण्यात आला त्यामध्ये अवघी तरूणाई ड़ुंबून गेली होती तसेच या वर्षी होणा-या निवड़णूकीमध्ये आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा म्हणून सर्वांनी एक प्रतिज्ञा घेतली या प्रतिज्ञेचे वाचन ड़ाॅ.शंतनु जगदाळे यांनी केले
या वेळी हड़पसर व परिसरातील योगेश गोंधळे,सोनाली मुसळे,मेघा पवार,अस्मिता सोनवणे,पौर्णिमा निचल,आण्णा भालेराव,अॅड़.गणेश कदम,रणजित चव्हाण,राजेन्द्र कुलकर्णी,करूणा आहेर,विहान कपूर,राजेश भोर,अनिल गोंदकर,जान्हवी बोरावके हे कलाकारांना ऊपस्थित होते
या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन दिलीप मोरे सर, रौफ शेख,महेश सुतार,आकाश जाधव, अमोल भोंगळे, राहुल व्यवहारे,श्रीकृष्ण भिंगारे,गणेश गोंजारे,हसीना मंड़ल यांनी केले होते.