भूषण गरुड,पुणे
अमेरिका, चीन, रशिया नंतर भारताने अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे. भारताने ”मिशन शक्तीचा” अंतर्गत मिसाईलद्वारे अवकाशातील कार्यरत असलेला उपग्रह नष्ट केला हे मिशन केवळ तीन मिनिटात पार पडले.
यावेळी देशवासीयांचे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा देशासाठी सर्वात महत्त्वपूर्ण क्षण आहे. आपल्या उपग्रहाचा फायदा सर्वांनाच होत आहे. यापुढे अंतराळ आणि उपग्रहाचा महत्त्व वाढत जाणार आहे. ऑंटी सॅटेलाईट – A SAT मिसाईल ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भारताने जी नवीन समता प्राप्त केली आहे ती देशाच्या सुरक्षेसाठी आहे भारताचे हे परीक्षण कोणाच्या विरोधात नाही आजची चाचणी ही कोणत्याच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी नाही तसेच आजच्या चाचणीमुळे भारत सुरक्षित राष्ट्र बनला आहे. मिशन शक्ती साठी आपली ताकद पणाला लावणाऱ्या डीआरडीओच्या सगळ्यात शास्त्रज्ञांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
उपग्रह नष्ट करणारी प्रणाली
पृथ्वीचा कक्षेमध्ये फिरत असणारे अर्थात भारतावर नजर ठेवणारे उपग्रह असतात. त्या उपग्रहांना उध्वस्त करणारे क्षेपणास्त्र तयार केले आहे. हे उपग्रह अवकाशात 200 ते 500 किलोमीटर पर्यंत असतात. अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहाचा वेग ताशी काही हजार किलोमीटरचा असतो. हे उपग्रह 90 मिनिटात पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करतात. तेवढ्या वेगात पृथ्वी भोवती फिरणारे उपग्रह आहेत. त्यांना एका बिंदूत गाठून उद्ध्वस्त करण्याची अचूकता डीआरडीओने साधली त्यामुळे यापुढे भारतावर नजर ठेवणारा किंवा भारतासाठी धोकादायक असणाऱ्या उपग्रहांना उद्ध्वस्त करणे शक्य होणार आहे.