अनिल चौधरी, पुणे
शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सुरवात युवा कार्यकर्ते दीपक कामठे यांनी कोंढवा ब्रूद्रुक गावातील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या दर्शनाने तसेच प्रचाराची पत्रके देवासमोर ठेवून केली.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक अतिशय रंजक होणार आहे.यामध्ये आघाडीचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे आणि महा आघाडीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. तसे आढळराव पाटलांची ही चौथी टर्म असणार आहे , यामध्ये दोन्ही उमेदवारांचे पारडे जड असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे . काही ठिकाणी तर या निवडणुकीत कोण जिंकणार यावर सट्टा- पैजा लागल्याचे बोलले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते दीपक कामठे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरप्रमुख चेतन तुपेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराला सुरुवात करून शिरूर मतदार संघात पर्यायाने हडपसर विधानसभा मतदार संघात आघाडी घेतली असल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे.