नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला हादरा भरत गावितांची अपक्ष उमेदवारी करणार

1907

शैलेंद्रचौधरी नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्याचे टॉप टेन खासदार तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सलग नऊ वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी दि ३० मार्च रोजी त्यांनी नवापूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा विचारविनिमयासाठी खास मेळाव्याचे देखील आयोजन केले आहे या मेळाव्यातुन ते आपली काँग्रेस पक्षा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असून त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यास काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड.के.सी.पाडवी यांच्यबरोबरच भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना देखील मोठे आव्हान उभे ठरणार आहे कारण ५२ वर्षे खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी काँग्रेसशी पक्षनिष्ठा आणि सर्व घटकांशी प्रेमभाव जपून मतदारसंघाशी बांधलेली घट्ट नाळ लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा एक भलामोठा कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी आहे.
पक्षाने माणिकराव गावित यांच्या ऐवजी भरत गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या या निष्ठेला व कार्याला न्याय दिला पाहिजे होता,अशी भावना या नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आहे.
माजी टॉप टेन खासदार पुत्र भरत गावीत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे पक्षाने घोर अपमान केला आहे व एकनिष्ठ काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांच्यावर अन्याय
झाल्याची भावना जपणारा हा कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय भरत गावीत यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह करीत आहे.
याचा भविष्यातील परिणाम काँग्रेस पक्षाचे जाहीर झालेले उमेदवार ॲड.के सी पाडवी यांची एक मोठी फळी विभागली जाईल हे निश्चित आहे.तसेच भारतीय जनता पार्टीत सुद्धा भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित आणि खासदार  हिना गावित यांच्या दुपटी कार्यपद्धतीवर नाराज असलेले आणि आतून पक्ष भेदणारे उत्सुक असलेले कार्यकर्ते सुद्धा भरत गावीत यांच्या पाठीशी अपक्ष उमेदवारी करण्यासाठी मजबूत आहेत 30 तारखेच्या मेळाव्यानंतर या अपक्ष उमेदवारी संदर्भात चित्र स्पष्ट होईल.
ठिकठिकाणी महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेस पक्षाला खिंडार पडत असतानाच नंदुरबार जिल्ह्यातही काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणारच यात मात्र शंका राहिलेली नाही कारण नुकतेच नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील काँग्रेस पक्षाचे सरपंच व संजय गांधी निराधार योजनेचे तालुकअध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षाला कंटाळून भारतीय ट्रायबाल पार्टी यात प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे.