2 वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून 10 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्याला गुन्हेशाखा युनिट-3 ने केली अटक

857

भूषण गरुड पुणे
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडाचीवाडी येथे शनिवार दि.23 मार्च रोजी रात्री 8.00 सुमारास सोमनाथ धनवडे(रा.वडाचीवाडी पुणे) यांचा 2 वर्षाचा मुलगा पुष्कराज सोमनाथ धनवडे हा घराच्या बाहेर खेळत असताना विकास रामभवन चौहान(वय 21, रा.खड्डा बुजुर्ग, जि.कुशीनगर, उत्तरप्रदेश) या व्यक्तिने अपहरण करून 10 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपास करीत असताना. गुन्हेशाखा पुणे शहर कडील सर्व युनिट व खंडणी पथकाच्या मदतीने पुष्कराज धनवडे या मुलाची त्याच दिवशी सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु त्या वेळेस अपहरणकर्ता पळून गेला होता. गुन्हेशाखा युनिट – 3 चे अधिकारी व कर्मचारी अपहरणकर्त्याचा तपास करत असताना. सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा पुणे – 1 पुणे शहर समीर शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अपहरणकर्ता मांजरी यापरिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुरुवार दि.28 मार्च रोजी सकाळी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अपहरणकर्त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करून कोंढवा पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आले.


कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा महादेव कुंभार सदर प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा – 1पुणे शहर समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, किरण अडागळे, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय गरुड, अनिल शिंदे, किशोर शिंदे, दीपक मते, प्रवीण तापकीर, मेहबूब मोकाशी, रामदास गोणते, संतोष शिरसागर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गाणंबोटे, वेल्सन डिसूझा, संदीप राठोड, अतुल साठे, संदीप तळेकर, सचिन गायकवाड, कैलास साळुंके, कल्पेश बनसोडे, सागर तोरडमल यांच्या पथकाने केली.