भूषण गरुड पुणे
लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने गुन्हे शाखा, गुन्हेकार्यप्रणाली यादीतील पाहिजे व फरार असलेल्या आरोपीचा शोध आदेशित केल्याची दखल घेत. गुन्हेशाखा युनिट – 4 पथकातील पोलीस नाईक रमेश चौधरी, निलेश शिवतारे यांना मिळालेल्या माहितीनुसार कोथरूड पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2014 रोजी घरफोडीच्या गुन्ह्यातील 5 वर्षापासून फरार असलेला आरोपी झाकीर सय्यद हा येरवडा परिसरात फिरत असून दि.27 मार्च रोजी येरवडा येथे त्याच्या मित्राला भेटण्या करता येणार असल्याची पक्की माहितीनुसार गुन्हेशाखा युनिट – 4 च्या पथकाने सापळा रचून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक 2019 चे अनुषंगाने गुन्हे शाखा गुन्हेकार्यप्रणाली यादीतील पाहिजे व फरारी असलेले आरोपी यांच्या शोध घेणे बाबत आदेशित केले असता. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा, गुन्हेकार्यप्रणाली मधील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध युनिट – 4 च्या पथकाकडून घेण्यात येत होता. गुन्हेशाखेतील पोलीस नाईक रमेश चौधरी, नीलेश शिवतारे यानां मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2014 मध्ये घरफोडीच्या गुन्ह्या मधील गुन्हा घडल्यापासून फरार असलेला आरोपी झाकिर बाबुमिया सय्यद(वय 27, रा.शिवनेरी नगर, गल्ली नंबर 12, कोंढवा पुणे) हा येरवडा परिसरात फिरत असून दि.27 मार्च रोजी येरवडा येथे त्याच्या मित्राला भेटण्या करता येणार असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार सय्यद यांच्यासोबत पोलीस कर्मचारी यशवंत बोराडे, सागर घोरपडे, सतीश वनवे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडून ताब्यात घेण्यात आले त्याची सखोल तपासणी व त्याचे आणखीन साथीदार असून ते सुद्धा गुन्हेकार्यप्रणालीतील लिस्टमधील आरोपीची माहिती मिळण्याबाबत कोथरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.