मल्हार न्यूज पुणे
सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. अनाथ व्यक्तीं सुध्दा सुख मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. परंतु अनाथांनी समाजात कितीही योग्य प्रकारे राहण्याचा प्रयत्न केला तरी समाज त्यांना खुल्या मनाने स्वीकारत नाही व अनाथ मुले वाईट मार्गाला लागतात. अशातच एक अनाथ युवक अनाथासाठी धावून येतो आणि अनाथांसाठी समाजात आधाराचा शोध घेतो. परंतु समाज त्यांना आधार देतनाही, तरी देखील ते कशाप्रकारे आधार मिळवतात हे आपणांस चित्रपट पाहिल्यावरच कळते. अशा प्रावासाची गोष्ट म्हणजेच मराठी चित्रपट ‘बाष्ट’ (उपर्यांचे अंतरंग) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्री साई फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘बाष्ट (उपर्यांचे अंतरंग)’ चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर डॉ.सतीश देसाई (माजी महापौर), संजय नहार (संस्थापक अध्यक्ष सरहद), श्री. अरुणम सकट (चैनल दिग्दर्शक), चन्द्रशेखर जोशी (चित्रपट अभ्यासक), सौ. विजयालक्ष्मी भोसले (इन्टर नॅशनल अवार्ड विनर) यांच्या उपस्थित पुणे येथील पत्रकार संघात प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष श्रावणी, निर्माता प्रशांत ग. शेठ, कलाकार श्रावणी आशिष, माधव सोळस्कर, राहूल फलटणकर, सुरज बाबर आणि प्रशांत शेठ, वितरक गणेश शिंदे व अन्य उपस्थित होते.
एक चांगली कथा मराठी प्रेक्षकांसाठी आणल्याचं समाधान निर्माते प्रशांत ग. शेठ यांनी व्यक्त केलं.‘दुसर्याच्या चेहर्यावर हसू आणणे हे खरं सुख’ असं सांगत, हा चित्रपटही हे हसू आणि सुख तुम्हाला निश्चितच देईल, असा विश्वास प्रशांत ग. शेठ यांनी व्यक्त केला. या सिनेमात अरुण नलावडे, उषा नाईक, प्रशांत शेठ, रोहित चव्हाण, श्रावणी आशिष, राहूल फलटणकर, सुरज बाबर या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शेठ, सहनिर्माते आदि रामचंन्द्र, आशिष पुजारी असून दिग्दर्शन आशिष श्रावणी यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन प्रशांत शेठ यांनी केलं असून संवाद व गीत प्रसन्ना यांचे आहेत.
‘बाष्ट’ (उपर्यांचे अंतरंग) 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.