भूषण गरुड
बिबवेवाडी आई माता मंदिराच्या शेजारी असलेल्या सोफासेट बनवण्याच्या कारखान्याला व बाजूला असलेल्या भंगारच्या बॉटल गोडाऊनला भीषण लागली. आगीत मध्ये दोन्हीपूर्णता भस्मसात झाली. त्या आगीची झळ बाजूलाच असलेल्या आई माता मंदिराच्या प्लास्टिकच्या शेड लागून आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या लोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि.30 मार्च रोजी दुपारी 2:30 सुमारास बिबवेवाडीत आई माता मंदिराच्या शेजारी 5 हजार स्क्वेअर फुट मध्ये असलेल्या कुषण पॅलेस सोफासेट बनवण्याचा कारखान्याला व सागर बॉटल भंगारच्या गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीची झळ बाजूला असलेल्या आई माता मंदिर प्लास्टिकचा शेड लागून आगीने रौद्र रूप धारण केले. कोंढवा खुर्द अग्निशामक दलाला वर्दी मिळताच तातडीने घटनास्थळी दोन गाड्या व विभागीय अग्निशामक अधिकारी सुनील गिलबिले, प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड, वाहनचालक सचिन चव्हाण, फायरमॅन – दळवी, खाडे, माने यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली या आगीत पाच मोटर सायकल एक चारचाकी पिकअप जीप बस्मसात झाली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मदतीला कात्रज अग्निशामक दलाच्या 2 गाड्या, अग्निशामक सेंटरच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याला आगीची माहिती कळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेत घडलेल्या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.