पुणे लोकसभा मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवार राजेश अग्रवाल निवडणूकीच्या रिंगणात

867

अनिल चौधरी,पुणे :

निवडणूकी पासून सदैव उच्चशिक्षित वर्ग दोन हाथ लांब असतात, असे सहसा पाहिले जाते. हीच प्रथा मोडत पुणे लोकसभा मतदारसंघातून एक उच्चशिक्षित म्हणजे सिवील इंजिनियअर असलेले श्री राजेश अग्रवाल यांनी निवडणूकीत आपले दंड थोपटले आहेत. राजेश अग्रवाल यांना हमारी अपनी पार्टी कडून अधिकृत उमेदवारी राष्ट्रीय अध्यक्ष पवनकुमार गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे. राजेश अग्रवाल गेल्या 25 वर्षापासून लायन्स क्लब, अग्रवाल समाज तसेच साईबाबा ट्रस्टच्या माध्यमातून समाजकार्य करित आहेत. समाजकार्य करताना पुणे शहरातील सर्वाच परिसर त्यांना परिचयाचा आहे. त्यांना  पुणे शहरातील समस्याची जाण आहे आणि ते उच्चशिक्षित असल्याने त्या कशा सोडवाव्यात यासाठीही त्यांचा अभ्यास आहे. तसेच त्यांना आर्थिक क्षेत्राचाही अभ्यास आहे, ज्या निश्‍चित पुण्याला फायदा होईल. शहरातील झोपडपट्टीतील लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत संपर्क असल्याने सर्वच स्तरातील लोकांच्या समसेची जाण त्यांना आहे. ऐवढे नव्हे तर ते स्वत: व्यापारी असल्या कारणाने व्यापार्‍यांच्याही अडअडचणी त्यांना माहिती आहेत.

राजेश अग्रवाल यांकडून आज उमेवारी अर्ज भरण्यात आला आहे. यावेळी आपले शक्ती प्रदर्शन करित मिरवणूक काढली. यावेळी हजारोच्या सेख्येने लोक सहभागी झाले होते. यांचे शक्ती प्रदर्शन पाहता भाजपा, कॉग्रेस आणि हमारी अपनी पार्टी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा, कॉग्रेस कडून अर्ज भरल्यानंतर हमारी अपनी पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी अर्ज भरला आहे.