कोंढव्यातील धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात

1651

मल्हार न्यूज प्रतिनिधी

कोंढवा खुर्द मधील संत ज्ञानेश्वर नगर येथील लेन नंबर 3 मधील शबाना मंजिल या पाच मजली इमारतीचा एका कॉलम ला क्रॅक (तडा) गेला होता, त्यामुळे ही इमारत धोकादायक झालीं होती.
यामुळे या इमारतीच्या मालकाला इमारत चोवीस तासात खाली आणि पाडण्याची नोटीस दिली होती. त्याप्रमाणे आज पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने सदर इमारत जमीनदोस्त करण्यास सुरवात केली.आज (४ एप्रिल)अंधार पडल्यामुळे कारवाई अर्ध्यावरच सोडण्यात आली असून उद्या (५ एप्रिल) संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात येईल असे पालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव गंबीरे यांनी मल्हार न्यूज ला माहिती देताना सांगितले. दरम्यान इमारतीच्या आजूबाजूच्या इमारतीमधील नागरिकांना त्यांच्या घरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या कारवाई वेळी पालिकेचे कार्यकारी अभियंता नामदेव गंबीरे, कारळे तसेच बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी के अडागळे आणि पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सदरची कारवाई एक चिमटा , एक पोकलँड मदतीने करण्यात आली.