माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक भगवान गिरासे यांचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती नाजूक

1761

शैलेंद्र चौधरी नंदुरबार 

नवापुर  येथील माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक भगवान रामचंद्र गिरासे हे मुंबईहून बेपत्ता झाले होते. त्यानंतर १ एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते नवापूर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने गिरासे हे सुखरूप घरी परतले होते.यानंतर चार दिवसांपासून ते कोणाजवळ काहीही बोलत नव्हते, परिवारवारा सोबत देखील ते कमी बोलत होते. शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक राहत्या घरात त्यांनी गळफास घेतला.घरातील सदस्यांच्या लक्षात हि बाब येताच  लगेच त्यांना पकडले आणि दोरी कापली त्यांना तात्काळ नवापूर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गिरासे यांची परिस्थिती नाजूक असून डॉक्टर गिरासे यांच्यावर उपचार करीत आहे. तर  पुढील अधिक उपचारार्थ नंदुरबार येथील एका खाजगी इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले आहे. गळफास घेण्याचे कारण अजून समजू शकले नाही.

     30 मार्च शनिवार रोजी मुंबई येथील टिळक भवनात कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्ष श्रेष्ठींच्या  भेटीसाठी माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित आपल्या परिवारा सोबत भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांचे स्वीय सहाय्यक भगवान गिरासे देखील हजर होते. भेटीनंतर संपूर्ण परिवार दादरहुन निघत असताना भगवान गिरासे यांनी गावित यांच्या तीन गाडया रवानाही केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले, काही वेळात बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांची शोध शोध  सुरु झाली.परंतू त्यांचा मोबाइल फोन बंद असल्याचे दाखवत असल्याने , दादर येथील पोलिस ठाण्यात ते  हरवल्याची नोंद करण्यात आलीहोती.त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने नावापुर येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान गिरासे आत्महत्येचा का प्रयत्न केला? या मागचे खरे कारण काय? हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.