महिला , मुलीनां मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

1904

मल्हार न्यूज, प्रतिनिधी

 ४७ वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुलीनां अश्लील शिवीगाळ , हाताने मारहाण करणाऱ्या नाना सोनावणे रा. पवार नगर ,क्रं२, थेरगाव वाकड याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचार कायदे भांदवि ३५४(अ),३२४,३२३,५०४,५०६(१) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी नाना सोनावणे यांचे पूर्वीपासून वाद होते. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून सोनावणे याने महिलेचा हात धरून तिला ओढत नेले. तसेच स्व:तचे लिंग बाहेर काढून महिला व तिच्या दोन्ही मुलीनां वाईट साईट बोलून, त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांचे कपडे फाडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपी नाना सोनावणे येथेच थांबला नाहीतर त्याने फिर्यादी महिलेच्या डोक्यात सिमेंटचे गट्टू मारून जखमी केले व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत. आरोपीला अजून अटक झालेली नाही.