मल्हार न्यूज ऑनलाईन,
गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या जन्मशताब्दी प्रकाशपर्वनिमित्ताने शीख यंग सर्कलच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षी देखील ” खालसा दुचाकी रॅली ” उत्साहात संपन्न झाली . या रॅलीचे यंदाचे २१ वे वर्ष होते . या रॅलीचा प्रारंभ पुणे लष्कर भागातील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथून माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते निशाणसाहब ध्वज उंचावून करण्यात आला . या रॅलीचे संयोजन शीख यंग सर्कल संस्थापक अध्यक्ष अमरजितसिंग परिहार यांनी केले होते . हि रॅलीचा गुरुद्वारा गुरुनानक दरबार , इंदिरा गांधी चौक , महावीर चौक , साचापीर स्ट्रीटमार्गे शरबतवाला चौक , क्वार्टर गेट चौक , नाना पेठ , गणेश पेठ गुरुद्वारा ,जिजामाता बाग , शिवाजीनगर गावठाण , तोफखाना . कामगार पुतळा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन , ससून रुग्णालय , अलंकार टॉकीज , बंडगार्डन , येरवडा , जय जवान नगर , यु. पी. हॉटेल , डेक्कन कॉलेज , होळकर पूल , खडकी गुरुद्वारा , दापोडी , कासारवाडी , पिंपरी , आकुर्डी येथील मानसरोवर गुरुद्वारा , निगडी मार्गे देहूरोड येथील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथे रॅली समाप्त झाली .
शीख धर्माची स्थापना दिवस व गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या जन्मशताब्दी प्रकाशपर्वनिमित्ताने शीख यंग सर्कलच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षी देखील ” खालसा दुचाकी रॅलीचे ” आयोजन करण्यात आले होते .या रॅलीमध्ये शीख समाजातील युवक युवती मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते .
यावेळी शीख यंग सर्कलचे अध्यक्ष अमरजितसिंग परिहार , कार्याध्यक्ष चरणजितसिंग कोहली , सरचिटणीस गुरुमुखसिंग खोक्कर , उपाध्यक्ष बलजितसिंग वाढे ,सहसचिव गुरुदेवसिंग वाढे , जनसंपर्क अधिकारी दलजितसिंग टूटेजा ,चरणजितसिंग सहानी , संतसिंग मोखा , हरमिंदरसिंग घई , गुरुमितसिंग रत्तू ,राजेंद्रसिंग वालिया , एस . एस वालिया , बच्चूसिंग टाक , प्रितपालसिंग खंडूजा , रणजितसिंग अजमानी , चरणजितसिंग कोहली आदी मान्यवर सहभागी झाले होते.