नंदूबारमध्ये सात उमेदवारांचे चौदा उमेदवारी अर्ज सादर

1377

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सात उमेदवारांनी चौदा नामनिर्देशनपत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांचेकडे सादर केले. आतापर्यंत एकूण नऊ उमेदवारांनी सोळा नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे डॉ.हिना गावीत यांनी तीन तर विजयकुमार कृष्णराव गावीत आणि सुहास नटावदकर यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशान पत्र सादर केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे के.सी.पाडवी यांनी दोन नामनिर्देशन पत्र सादर केले. रेखा सुरेश देसाई यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे दोन नामनिर्देशन पत्र सादर केले.
श्री. नटावदकर यांनी दोन तर श्रीमती गावीत यांनी एक नामनिर्देशन पत्र अपक्ष उमेदवार म्हणून सादर केले. भरत जाल्या पावरा आणि अशोक दौलतसिंग पाडवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशनपत्र सादर केले.
तत्पुर्वी शुक्रवारी दोन अर्ज सादर करण्यात आले होते.