Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणे‘बायको देता का बायको’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित

‘बायको देता का बायको’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित

मल्हार न्यूज प्रतिनिधी, पुणे 

‘लग्न’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण. वयात आलेल्या प्रत्येक युवकाला आपलंही लवकर लग्न व्हावं, सुंदर व सुशील बायको मिळावी आणि आपली जोडी चारचौघांत उठून दिसावी अशी इच्छा असते. याच भावनेतून बायकोच्या शोधात निघालेल्या युवकांची कथा सांगणारा बायको देता का बायको हा धमालपट मराठीत येऊ घातला आहे.

‘वाय डी फिल्मस्’ निर्मित बायको देता का बायको’ चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली. लग्नपत्रिकेद्वारे प्रदर्शित करण्यात आलेली चित्रपटाची पहिली झलक उत्सुकता वाढवणारी आहे. आंतरपाटाआड एका युवकाची अर्धी झलक पहायला मिळत असून यावर लिहिलेला मजकूरही चित्रपटाची गंमत व त्यातला महत्त्वपूर्ण आशय दाखवून देणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांचे तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे.

ऐन लग्नसराईच्या मोसमात धमाल उडवून देण्यासाठी बायको देता का बायको’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!