Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रअमोल कागणे मांडणार अभिनयाचा  डाव

अमोल कागणे मांडणार अभिनयाचा  डाव

मल्हार न्यूज, ऑनलाइन 
पदार्पणातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये यशस्वी निर्मात्याचे बिरुद पटकावणारे अमोल लक्ष्मण कागणे खऱ्या अर्थाने मराठी मनोरंजनक्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी कार्यरत आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. ‘हलाल’,  ‘लेथ जोशी’ आणि ‘परफ्युम’ यांसारख्या सामाजिक विषयांवर सटीक भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी अमोल कागणे फिल्म्स या त्यांच्या संस्थेला सर्व स्तरांवर नावाजले गेले आहे. पुणे येथील ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या अमोल कागणे यांनी तब्ब्ल २६ हुन अधिक नाटकात अभि़नय केला आहे. मनोरंजनक्षेत्राची असणारी गोडी आता त्यांना अभिनयक्षेत्राकडे वळवू पाहत असून लवकरच ते आपल्याला निरनिराळ्या भूमिकांतून रसिक-प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतील.
 मराठी सिनेसृष्टीत येणाऱ्या चित्रपटांचं गणित एक निर्माता म्हणून अमोल कागणेंना उत्तम जमतं. विषय-आशयाकडे बारकाईने लक्ष पुरवत अमोल कागणे फिल्म्सद्वारा निवडले गेलेले चित्रपटही हटके असून येत्या वर्षभरात त्यांचे एक नाही दोन नाही तर तब्ब्ल ६ सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. अमोलने निर्मितीक्षेत्रात एक प्रकारची ऊर्जा निर्माण केल्यानंतर आत्ता अभिनयक्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. अमोल सध्या बॅक टू बॅक चित्रपट करतोय ज्यात त्याच्या भूमिका एक सरप्राईझ एलिमेंट्स ठरतील. मल्हार फिल्म्स क्रिएशन्सचा ‘बाबो’ ह्या त्यातलाच एक सिनेमा असून पै. सचिन बाबुराव पवार निर्मित आणि रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ या चित्रपटात अमोल म्हणजे प्रेक्षकांसाठी सरप्राईझ पॅकेजच असणार आहे. बबलू हा इंजिनीयरिंगचा स्टुडंट आहे. बबलू म्हणजेच अमोल कागणे ह्यात थोडासा शांत, सोज्वळ थोडासा रोमँटिक असा काहीसा गोंधळलेल्या अवस्थेत दिसेल.
मराठी मनोरंजनक्षेत्रातल्या नामवंत विनोदी कलावंतांसोबत अमोलही आपलं अभिनयाचं टाईमिंग आजमावणार आहे. इरसाल विनोदवीरांसोबतची ही जुगलबंदी ३१ मे पासून आपण आपल्या जवळच्या चित्रपगृहांत जाऊन पाहू शकता त्याआधी या सिनेमाचा फर्स्ट लूक तुम्ही सोशल साईट्सवर पाहू शकता. ‘बाबो’मध्ये अमोल एक मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. ही व्यक्तिरेखा काहीशी मजेशीर काहीशी रोमँटिक अशी असून आत्तापर्यंत एक निर्माता म्हणून प्रेक्षकांनी उदंड प्रेम दिलं आणि आता माझ्या अभिनयाला सुद्धा प्रेक्षकपसंतीची पावती मिळेल याची खात्री अमोल कागणेंना आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!