शक्तीप्रदर्शाने आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

667

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिरूर लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक उपजिल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना-भाजपा आरपीआय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.  

      उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी भाजपाचे आमदार योगेश टिळेकर ,मा.आ.महादेव बाबर आणि शिवसेना भाजपा युतीचे कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकानी पुण्यात केलेली तुडूंब गर्दी केली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,पुण्याचे पालकमंत्री गिरीषजी बापट,खासदार अनिल देसाई,शिवसेना उपनेत्या आमदार निलमताई गो-र्हे,शिरुर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे,भोसरीचे आमदार महेश लांडगे,हडपसरचे आमदार योगेश टिळेकर,खेडचे आमदार सुरेश गोरे,जुन्नरचे आमदार शरद सोनवणे,पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव तसेच भाजप-शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळेस मा.शिवाजीराव आढळराव पाटील चौकार तर मारणारचं, पण हा चौकार पाच लाख मतांपेक्षा जास्त मतांचा विजयी चौकार असेल असा ठाम विश्वास पुण्याचे पालकमंत्री मा.गिरीशजी बापट यांनी व्यक्त केला.