निवडणूक खर्च निरीक्षक तिवारी आणि गुलाठी यांची एमसीएमसीला भेट

642

मल्हार न्यूज प्रतिनिधी, पुणे

जिल्‍ह्यात लोकसभा निवडणुकांची माहिती प्रसारमाध्‍यमांना उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या मिडीया सेंटरला तसेच जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) निवडणूक खर्च निरीक्षक सौरभ तिवारी आणि प्रियंका गुलाठी यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी समन्‍वय अधिकारी तथा उप जिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तहसिलदार पल्‍लवी घाडगे, नायब तहसिलदार प्रमोद काशीकर आदी उपस्थित होते. एमसीएमसीकडून प्रमाणित करण्‍यात येणा-या जाहिरातींची कार्यपध्‍दती, पेडन्‍यूज याबाबत त्‍यांनी माहिती जाणून घेतली.

नवीन मध्‍यवर्ती इमारतीमध्‍ये जिल्‍हा माहिती कार्यालयात एमसीएमसी कक्ष स्‍थापन करण्‍यात आला असून विहीत नमुन्‍यातील अर्ज भरुन सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत कार्यवाही केली जात असल्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितले. प्रमाणपत्राचा नमुना अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयातील (कॅण्‍टीनजवळील) तळमजल्‍यावरील मिडीया सेंटरमध्‍ये तसेच जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्ध असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.