गर्भनिरोधक गोळ्यांचा गैरवापराने धोकादायक रोगांना आमंत्रण: डॉ.गोयल

868

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

आजच्या काळात पौगंडावस्थेतील मुली आणि तरूण मुली खूप लवकर असुरक्षित संभोग करतात. याबाबतीत कटू सत्य हे की, तरुण मुली त्यांच्या लैंगिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. गर्भधारणा टाळण्यासाठी या मुली डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भनिरोधक गोळ्या घेतात आणि त्यांना या गोळ्यांच्या घातक परिणामांबद्दल काहीच माहिती नसते.

गर्भनिरोधक गोळ्यांना मॉर्निंग पिल्स असेही म्हणतात. या गोळ्यांमध्ये लेव्होनोरजेस्ट्रेल हे प्रोजेस्टरॉन असतेही गोळी औषधाच्या दुकानात मिळते आणि या पाकिटात दोन गोळ्या असतात. संततीनियमनाच्या साधनाचा उपयोग न झाल्यास किंवा असुरक्षित लैंगिक संबंध राखल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी लवकरात लवकर किंवा ७२ तासांच्या आत घेण्यात यावी. ही गोळी गर्भधारणा केली असल्यास घ्यावी आणि महिन्यातून एकदाच घेतली जावी. पण आजकाल मुली या गोळ्या महिन्यातून अनेकदा घेतात आणि कधीकधी कोणत्याही प्रकारची लैंगिक कृती केल्यावर घेतात. या गोळीचे परिणाम आणि साईड इफेक्ट्स याची त्यांना काहीच कल्पना नसते. गर्भनिरोधक गोळ्या ही आजच्या काळाची गरज आहे यात काहीच शंका नाही पण त्यांचा वापर करण्याआधी महिलांचे योग्य प्रकारे समुपदेशन होणे आवश्यक आहे अशी माहिती डॉ.मोहिता गोयल यांनी गर्भनिरोधक गोळ्यांचा गैरवापर आणि उपचार यावर माहिती देताना सांगितले.

गर्भनिरोधक गोळ्या महिन्यातून एकाहून अधिक वेळा घेतल्या तर गर्भधारणा रोखण्यात त्यांना अपयश येऊ शकते. या गोळ्यांमुळे अनियमित रक्तस्त्राव, अनियमित पाळी,मळमळ, उलट्या, स्तनांना सूज येणे, शरीर सुजणे, वजन वाढणे, स्वभावात तीव्र चढउतार होणे इत्यादी परिणाम होतातत्याचप्रमाणे या गोळ्यांमुळे लैंगिक संक्रमित आजारांपासून संरक्षण होत नाही.

या गोळ्या औषधाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने पौगंडावस्थेतील मुलींमध्ये लैंगिक संबंध राखण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लैंगिक संक्रमित आजारांचे आणि एचआयव्हीचे प्रमाण वाढले आहे. म्हणून या गोळ्या घेण्यापूर्वी त्यांचा वापर आणि साईड इफेक्ट्स यांची माहिती घ्यावी असे डॉ. मोहिता गोयल यावेळी म्हणाले.