महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांचा प्रचार शिगेला

883

बीड प्रतिनिधी

३९ बीड लोकसभा निवडणूक 2019 च्या भा.ज.पा ,शिवसेना ,रिपाई रासप ,रयत क्रांती, महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ 10 एप्रिल रोजी बीड तालुक्यातील पिंपळनेर जि.प.सर्कल मधील ताडसोन्ना,केसापुरी, परभणी येथे जनतेशी संवाद साधून सरकारने ज्या योजना चालू केलेल्या आहेत तसेच केंद्र शासन,राज्य शासन यांच्या माध्यमातून झालेली कामे सांगून पुढेही असाच विकासकामांचा धुमधडाका चालू राहावा व आपल्या जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी खंबीरपणे महायुतीच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन आ.लक्ष्मण आण्णा पवार व बाळासाहेब मस्के यांनी केले. यावेळी ताडसोन्ना गावातील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने महायुतीचा प्रचार शिगेला गेल्याचे पहावयास मिळते.

तसेच यंदा बीड  जिल्‍ह्‍यात सर्वत्र दुष्‍काळ असुन जिल्‍ह्‍यात जनावरांसाठी चारा छावण्‍या सुरु करण्‍यात आलेल्‍या आहेत.या अनुसंगाने प्रचारा दरम्‍यान केसापुरी ता.जि.बीड येथे चारा छावणीस त्यांनी  भेट देऊन पाहणी केली.यावेळी आ.लक्ष्‍मण  पवार,भा.ज.य.मो.प्रदेश सचिव बाळासाहेब मस्‍के समवेत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते सह केसापुरी गावातील पशुपालक शेतकरी व नागरीक उपस्‍थित होते..