उमेदवारांचे दैनंदिन लेखे, रोख नोंदवही तपासणी वेळापत्रक

594

34 पुणे लोकसभा मतदार संघ

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. 34 पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, 12 एप्रिल,2019 रोजी सकाळी 11 वाजता प्रथम तपासणी, 16 एप्रिल,2019 रोजी सकाळी 11 वाजता द्वितीय तपासणी आणि 21 एप्रिल,2019 रोजी सकाळी 11 वाजता तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, तळमजला, पुणे येथे ही तपासणी करण्यात येणार आहे