उमेदवारांनी व्हीव्हीपॅट बाबत माहिती करून घ्यावी-बालाजी मंजुळे

616

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार लोकसभा निवडणुक 2019 अंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी त्याबाबत माहिती करून घ्यावी आणि मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण बैठकीत ते बोलत होते.बैठकीस केंद्रीय निवडणूक निरीक्षक शाहजान ए., पोलीस अधीक्षक संजय पाटील,अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार,उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे , उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आदी उपस्थित होते.
उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक खर्च,त्याविषयीच्या नोंदी, निवडणूक खर्च सादर करणे,स्टार प्रचारकाचा खर्च, माध्यम प्रसिद्धीसाठी खर्च आदीविषयी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
पोलीस अधीक्षक पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत तर श्री.जगदाळे यांनी आदर्श आचारसंहितेबाबत मा‍हिती दिली.जिल्हा माहिती अधिकारी यांनी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली.यावेळी प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.