बनावट स्कॉचचा ४४ लिटर्सचा साठा जप्त

957

पनवेल ,गिरीश भोपी

राज्य उत्पादन शुल्क पनवेल यांनी काल उरण नाका परिसर येथे यश हाॕस्पीटलसमोर बनावट स्काॕच वाहतुकीवर पाळत ठेवली असतांना गोखले शाळेजवळील खोलीत छापा घातला असता बनावट स्काॕचचा ४४ लिटर्सचा साठा आणि दोन दुचाकी वाहने जप्त केली. यात विविध ब्रॕन्डच्या १ लिटर क्षमतेच्या एकूण ४४ बाटल्या होत्या.

स्काॕच बनविण्यासाठी लागणारे साहित्य – २फनेल, २ मग , १ टोचा व विविध ब्रॕडच्या बनावट बाटल्या बनविण्यासाठी वापरली जाणारी झाकणे व इतर साहित्य ४ मोबाईल्स असा सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

यासंदर्भात १ गुन्हा दाखल झाला असून २ आरोपींपैकी १ फरार आहे. होन्डा कंपनीचे ॲक्टिवा वाहन क्र .MH – 46/ TC -14 A व १ एप्रिला कंपनीचे दुचाकी वाहन क्र -MH- 46/BL-3142 जप्त करण्यात आले आहे.