मल्हार न्यूज प्रतिनिधी,
सोळा वर्षीय मुलीच्या अंगावर हात फिरवून याची वाच्यता जर कोठे केली तर अॅसिड तोंडावर टाकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी देणाऱ्या रिक्षाचालक जोसेफ अंथोनी देवनेसन वय ४०वर्षे,रा.महात्मा फुलेनगर दापोडी याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात भां.द.वि.३५४, ३५४(ड),५०६, बाल लैंगिक अत्याचार प्रतीबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पिडीताच्या नातेवाइकांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काबुगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंथोनी ने अल्पवयीन मुलीचा दोन तीन वेळा पाठलाग केला होता. घटनेच्या दिवशी पीडिता दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग शाळेचे समोर टिकल्या घेण्यासाठी गेली होती. टिकल्या घेण्यासाठी ती वाकली असता आरोपी अंथोनी ने तिच्या पाठीमागून हात फिरवला. हि बाब तिने कोणास सांगितल्यास मी तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून तुझे तोंड विद्रूप करून टाकीन तसेच तुला कोठेही तोंड दाखविण्याच्या लायक ठेवणार नाही अशी धमकी दिली. पिडीत मुलीने आपल्या घरी सदर घटना सांगितल्याने ताबडतोब तिच्या घरच्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुधा घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काबुगडे करत आहेत.