मल्हार न्यूज प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र सीएससी-विएलईच्या संघटनेतर्फे पुण्यातील मंडई परिसरात १०० टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने मतदान जागृती फेरी काढण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष कैलास बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती करण्यात आली. यावेळी नागरिकांना मतदानाच्या दिवशी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठीचे आवाहन करण्यात आले.
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली मतदान जनजागृती फेरी शिवाजी रोडने शुक्रवार पेठ पासून लक्ष्मी रोड ने पुन्हा मंडई अशी मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी लोकांना मतदान जरूर करा, योग्य विचार करून आपला उमेदवार निवडावा, मतदानाच्या दिवशी कुठेही फिरायला न जाता पहिले मतदान करूनच बाहेर पडावे , मतदान करा कोणालाही करा , पण मतदान जरुर करा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी सीएससी-विएलईचे अध्यक्ष कैलास बनसोडे, कविता राठोड, अश्विनी पुराणिक, पुनीत धवन, मयूर गुजर, सुहास मोरे,राहुल शिंदे, राज कजानीया, नितेश सातघरे, अमीर पठान, प्रवीण डोके, अनिल चौधरी उपस्थित होते.