महिलेला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यास अटक

756

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

दारू पिण्यासाठी तसेच इतर खर्च भागविण्यासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये ,नाही दिले म्हणून विवाहित महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या तिचा पती सुहास सुरेश बोऱ्हाटे वय-३१ वर्षे, रा. चिखली, याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात भां.द.वि. क ४९८(अ),३२३,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी महिलेला आरोपी सुहास बोराटे हा २०१४ पासून आत्तापर्यंत त्रास देत होता. माहेरवरून तुझ्या आई-वडिलांकडून रिक्षा घेण्यासाठी पैंसे घेऊन ये असे म्हणून वारंवार त्रास देत असत. तसेच त्याला दारू पिण्यासाठी व माझे खर्चासाठी पैसे घेऊन ये आणि नाही दिले तर टोचून बोलणे असे वारंवार करत असत. महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले परंतु आरोपी बोराटे याने तिला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वारंवार पैशांची मागणी करून फिर्यादी यांचा मानसिक व शाररीक छळ  केला .तसेच आर्थिक छळ देखील केला . रोजच्या छळाला कंटाळून अखेर फिर्यादी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली असून त्याला अटक करण्यात आली आहे .पुढील तपास सुरु आहे.