Sunday, April 27, 2025
Google search engine
HomeMalhar Newsजागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन

जागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ में रोजी सई ताम्हणकर श्रमदान करायला जाणार आहे. आणि तिने आपल्या चाहत्यांनाही श्रमदानाचे महत्व पटवून देणारा एक व्हिडीयो सोशल मीडियावरून अपलोड केला आहे.
पाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठी योगदान देणारी सजग अभिनेत्री सई ताम्हणकर यंदाही महाराष्ट्रदिनी श्रमदान करणार आहे. सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे.
सूत्रांच्या अनुसार, श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष असेल. सई न चुकता दरवर्षी महाश्रमदानात हिस्सा घेते. पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाशिवाय  वर्षभर होणा-या कार्यक्रमांनाही सई आवर्जून सहभागी होते.
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते, “पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणा-या गुराढोरांसाठी, पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी, डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणा-या बायकांसाठी, आणि करपणा-या शेतांसाठी मी ह्या महाराष्ट्रदिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे. मी माझ्या पध्दतीने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही सहभागी व्हा.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!