राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल; आदित्य ठाकरे

669

महेश फलटणकर , उरुळी कांचन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल. त्यामुळे जनतेला मजबूर सरकार पाहिजे की, मजबूत सरकार पाहिजे हे तेथील
जनतेने ठरवायचे आहे. असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उरुळी कांचन (ता. हवेली ) येथे केले.

शिरूर मतदार संघातील महायुतीचे लोकसभा उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी (ता. २३ ) उरुळी कांचन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वरील मत व्यक्त केले.

यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार बाबुराव पाचर्णे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, हवेली तालुका भाजपा अध्यक्ष रोहिदास उंद्रे, लक्ष्मण मंडले, राजेंद्र पायगुडे, बाळासाहेब कांचन, सुनील कांचन, अजिंक्य कांचन, स्वप्नील कुंजीर, काळूराम मेमाणे, बापूसाहेब तुपे, संतोष कांचन, श्रद्धा कदम, प्रतिभा कांचन, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, “आघाडीसोबत असलेली नेते मंडळी जम्मू कश्मीरमध्ये ३७० कलम तसेच ठेवणार असल्याचे सांगत आहेत. त्यांची सत्ता आल्यास देशात आणखी एक पंतप्रधान होईल. आणि तो लोकांना नको आहे. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल. असा टोलाही त्यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. त्याठिकाणी महायुतीला चांगल्या प्रकारचे वातावरण आहे. राज्यात ४८ पैकी ४८ उमेदवार विजयी होतील. तसेच राज्यात सगळीकडे भगवा रंग नसरेस पडत आहे.
सगळीकडे युतीचाच बोलबाला दिसत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युतीला मोठ्या प्रमानात यश मिळेल.”

बाबुराव पाचर्णे म्हणाले की, यशवंत सहकारी साखर कारखाना ज्यांनी बंद पडला त्यांना विचारण्याचा काहीही अधिकार नाही. यशवंत साखर कारखान्याच्या जमिनीवर कोणाचा डोळा आहे हे परिसरातील जनतेला माहिती आहे. आणि यशवंत कारखाना चालू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगितले आहे.