सरकार शेतकरी विरोधी नाही तर शेतकरी हिताचे सरकार आहे

789

महेश फलटणकर,उरुळी कांचन

सरकार शेतकरी विरोधी नाही तर शेतकरी हिताचे सरकार आहे मात्र विरोधकांकडे मुद्दे नसल्याने भाजप सरकार आरोप करत टिका करत असुन ह्याना स्वताःच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी दुसरा पक्षाच्या पक्ष प्रमुख घ्यावा लागत आहे हीच त्यांची निषर्कीता असल्याची टिका माजी राज्य महसुल मंत्री  सुरेश धस यांनी केली.

शिवसेनेचे  शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचार्थ आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, दौंडचे राहुल कुल, भाजपा तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, जि. प.सदस्य माऊली कटके, चित्तरंजन गायकवाड, महिला आघाडीच्या श्रद्धा कदम, कदम वाकवस्ती सरपंच गौरी गायकवाड, रमेश भोसले,स्वप्निल कुंजीर, संतोष भोसले, विठ्ठल काळभोर तसेच शिवसैनिक व नागरीक उपस्थित होते. 

  यावेळी बोलताना म्हणाले की भाजप सरकार मुळे शेतकर्याना शासकीय योजनाचे मिळणारे अनुदान थेट बॅक खात्या जमा होत असल्याने शेतकरी योजनांच्या अनुदानावर डल्ला मारता येत नसल्याने हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी आरडाओरडा करत आहेत. आघाडी सरकारच्या काळात योजनांचे अनुदान हे शेतकर्यापर्यत जात नव्हते पण त्याचा फायदा गावातील  ठराविक त्यांनाच्या कार्यकर्त्यां मिळत होता पण मोदी सरकारमुळे शेतकर्याचे अनुदान थेट बॅक खात्या जमा होत असल्याने काही मंडळीची दुकानदारी बंद झाल्याने ही मंडळी सरकारच्या नावाने ओरडत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला.