Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेभाजप सरकारने सत्तेचा गैरवापर केला :पवार

भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर केला :पवार

महेश फलटणकर, लोणी काळभोर

भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करून देश देशोडला लावण्याचे काम केली असून एक कलमी कारभारामुळे जनता हातघाईला आली आहे.सर्व सामान्याचे सरकार नसून हे उद्योगपतीच्या भल्याचे सरकार असल्याची टीका महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
  राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचार्थ आयोजित करण्यात आले सभेच्या वेळी ते बोलत या वेळी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी आमदार जग्गनाथ शेवाळे,अशोक पवार,माजी जि.प.अध्यक्ष प्रदीप कंद,जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, कॉग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष देविदास भन्साळी,कॉग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास काळभोर जि.प.सदस्या सुनंदा शेलार,पंचायत समिती सदस्य युंगधर काळभोर, विलास काळभोर,माधव काळभोर,प्रताप गायकवाड,राहुल काळभोर,नंदू काळभोर,योगेश काळभोर तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
  यावेळी बोलताना पवार म्हणाले कि मोदी सरकारने पाच वर्ष पोपटासारखे मिटू मिटू बोलून जनतेला फसवण्याचे काम केले असून एक हि ठोस काम त्यांच्याकडून झाले नाही.याउलट या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली,महागाई तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीचा विषय फसला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाणदेखील ह्या सरकारच्या काळात वाढले आहे.मात्र या बाबत प्रश्न विचारले तर उत्तर देत नाहीत.पण जाहिराती वर खर्च करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे.परंतु जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास वेळ नाही.बळीराजाचे राज्य आणण्याचे असेल तर सर्वांनी एकदिलाने गटतट बघता मोठ्या मताधिक्याने शिरूर लोकसभेचे उमेदवार निवडून द्या असे आव्हान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मतदारांना केले.  
  साध्वी प्रज्ञा सिंह ,योगी आदित्य नाथ,सिद्धेश्वरस्वामी,साक्षी महाराज असे उमेदवार दिल्लीत पाठवून त्याठिकाणी जनतेचे प्रश्न संसदेत मांडणार का ? दिल्लीत कुंभमेळा भरवणार का ?
 सक्षणा सलगर – राष्ट्रवादी कॉग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!