Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीमतदारांना पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना अटक

मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना अटक

कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रायगड दि २७:

कामोठे येथे  पैसे वाटप करणाऱ्या दोघा  कार्यकर्त्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्यकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह ,फोटो व नावे असलेली यादी सापडली  चरणदीपसिंग, बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल मनपा) , महेंद्र जगन्नाथ भोपी , विजय त्रिंबक चिपळकर(नगरसेवक पनवेल मनपा यांनी या इसमांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

कामोठे पोलिसांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी भा. द.वि. कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!