शैलेंद्र चौधरी नंदुरबार
नंदुरबार येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) धनंजय निकम,तहसिलदार रामचंद्र पवार,नायब तहसिलदार आशा सोनवणे आदी उपस्थित होते.
—-
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा
नंदुरबार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखूयुक्त पदार्थापासून होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती व अवगत करणे तसेच कोटपा कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात साजरा होणाऱ्या 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र दिन कार्यक्रमामध्ये तंबाखू मुक्त प्रतिज्ञा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले आहेत.
शासनांच्या विविध कार्यालये व शैक्षणिक संस्था यामधील कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात यावी तसेच प्रत्येक ग्रामपंचायत गांव, तालुका,जिल्हा पातळीवर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालयांमध्येदेखील प्रतिज्ञा देण्यात यावी,असे श्री.मंजुळे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे..
0 0 0 0 0 0 0
महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहण कार्यक्रम
नंदुरबार महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिन समारंभ 1 मे 2019 रोजी साजारा करण्यात येणार असून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय नवीन कवायत मैदान येथे होणार आहे.
कार्यक्रमास सर्व लोकप्रतिनिधी,स्वातंत्र्य सैनिक,शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
—-
निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा कोठडीची पाहणी
नंदुरबार केंद्रीय निवडणूक निरीक्षक शाहजान ए.यांनी महाराष्ट्र वखार महामंडळ येथील गोदाम परिसरात मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कोठडीची पाहणी केली.त्यांनी यादृच्छिक पद्धतीने मतदान केंद्रावरील नोंदवह्यांची तपासणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे,पोलीस अधिकक्षक संजय पाटील,अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार,उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे,धनंजय निकम होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सुरक्षा कोठडी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.ईव्हीएम यंत्रे ठेवल्यानंतर सुरक्षा कोठडीला सील लावण्यात आले.