विवाहित महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

765

मल्हार न्यूज प्रतिनिधी, पुणे

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलेच्या अनाधिकृतपणे घरात घुसून गैरवर्तन करण्याऱ्या नितीन अशोक कड रा.संतोषनगर भाम, ता.खेड जि.पुणे याच्यावर  चाकण पोलीस ठाण्यात भां.द.वि.३५४,४५२, ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला असून त्यास लवकरच अटक केली जाईल अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी सहा.पो.फौजदार वाघुले यांनी दिली.

 याबात अधिक माहिती देताना तपासी अधिकारी म्हणाले कि, घटनेच्या दिवशी २१ वर्षीय महिला एकटीच घरी होती. महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून आरोपी नितीन कड याने महिलेच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून माझ्याशी तू आता संपर्क (कॉन्क्टॅक) का ठेवत नाही असे म्हणून सदर महिलेचा  हात पकडून तिला मिठी मारून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याचवेळी महिलेचा पती घरात आले असता आरोपी नितीन याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने महिलेच्या पतीच्या डोक्यात काठीने मारून  दुखापत केली. तुला उद्या बघून घेतो अशी धमकी देऊन येथून निघून गेला.पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.