मिस्टर अँड मिसेस मिस्टिक महाराष्ट्र चे आयोजन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार

1135

मल्हार न्यूज प्रतिनिधी,पुणे:-

दीपस्तंभ क्रिएशन ,इंपेल इव्हेंट अँड एटरटेन्मेंट व थ्रेड्स प्रस्तुत मिस्टर अँड मिसेस महाराष्ट्र अशी आगळी वेगळी फॅशन पेजेन्ट स्पर्धा पुण्यात प्रथमच होणार आहे.
एकाच वेळेस 1000 महिला पुरुष करणार मेकअप टिटोरियल च्या माध्यमातून त्यानंतर 5000 मॉडेल एकाच रॅम्प वर कॅटवॉक करणार आहेत.ह्या आधी हा विश्वविक्रम (युनायटेड युरायुक नरीस कॉस्मटिक कंपनी) च्या वतीने 4 जुले 2015 ला 355 लोकांनी केला होता.तसेच (युनायटेड किंगडम लिव्हर पूल युके) च्या वतीने 3651 लोकांनी कॅटवॉक केला होता.
हा उपक्रम 14 ऑगस्ट 2019 ला होणार असून त्याची थीम “तिरंगा” व भारतीय संस्कृती असणार आहे.या मध्ये 5000 लोक सहभागी होतील व हा विश्वविक्रम करतील.त्यानंतर यामध्ये 60 सहभागी 30 व पुरुष 30 निवडण्यात येणार आहेत.तसेच त्यांना एक आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यामध्ये वयोगट 18 ते 45 असा आहे.प्रवेश फी 2000 इतकी असणार आहे.येत्या 15 मे पासून याची नोंदणी सुरू होणार आहे नोंदणीसाठी www.mystiquemaharashtra.com वर क्लीक करावे. संपर्क-7057719119 / 9922425184
पुणेकरांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक दीपक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले. या उपक्रमात त्यांच्या सोबत इंपेल इव्हेंट चे तन्वी कुरेशी व सत्यम कांबळे तसेच वेशभूषाकार स्नेहा केदारी हे आहेत.