भारतीय योग्य संस्थेच्यावतीने निशुल्क योग्य शिबिराचे आयोजन

580

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

बी टी कवडे रोड येथील पुणे महानगरपालिकेच्या जयसिंगराव ससाणे उद्यानात भारतीय योग्य संस्थेच्यावतीने निशुल्क योग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या योग्य शिबिरात तरुण , तरुणी , जेष्ठ नागरिक व स्त्रिया सहभागी झाले होते . तणाव व अवसाद रोगनिवारण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले . शिबिरात जयंत रानडे व अलका राऊत यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .

या शिबिरास महेश पुंडे , डॉ राजन पटेल , कैलास पटेल , सुधाकर शेट्टी , स्मिता जोशी , अशोक बसेर , भाग्यश्री बसेर , श्रीराम केकडे , योगाचार्य कालिदास केळकर , गजानन कल्याणकर , भुवनेश्वरी देसाई , छाया कुलकर्णी , सुरेखा महेंद्रकर , मनोज खंडेलवाल , कुलदीप बिंद्रा , अशोक भतीजा , अनिल  महेंद्रकर ,प्रताप हिवाळे , सुनील वोरा , पीटर डिसोझा , बाळकृष्ण शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी परिक्षणाचे काम रेखा वर्णेकर , शालिनी भोसले , देवकी शेट्टी यांनी केले .

आरोग्य व्यवस्थित , सुदृढ राहावे यासाठी योग्य शिक्षण , प्राणायाम आवश्यक आहे ,  तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता टिकविण्यासाठी व आपली आरोग्यपूर्ण दिनचर्या , श्रमप्रतिष्ठा , आपली जबाबदारी , आपले समाजातील इतर घटकाशी असणारे वर्तन कसे असावे याची माहिती या योग्य शिबिरातून देण्यात आली . भविष्यात समाज हा निरोगी व एक आदर्श घटक निर्माण व्हावा यासाठी या शिबिराच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला . अशी माहिती सुधाकर शेट्टी यांनी दिली .