मल्हार न्यूज (ऑनलाईन)
– प्रीमिअम फळांपासून तयार केलेल्या या रेंजमध्ये १००% भारतीय फळे, ० % कॉन्सन्ट्रेट आणि ०% अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज समाविष्ट असून ही या विभागातील सुविधाजनक पेट बॉटल्समध्ये उपलब्ध असलेली अशी एकमेव रेंज आहे नॅशनल, ३ मे २०१९: ITC च्या फुड डिव्हिजनने आपल्या फ्रुट बेव्हरेजेसच्या बी नॅचरल रेंजतर्फे असेप्टिक पेट बॉटल्समध्ये मिळणाऱ्या देशातील पहिल्या अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसलेल्या प्रीमिअम फ्रुट बेव्हरेजेससह अजून एका क्रांतिकारक उत्पादन रेंजची घोषणा केली. गेल्या वर्षी ब्रँडने आपल्या फ्रुट बेव्हरेज पोर्टफोलियोच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये अमुलाग्र बदल केला. बी नॅचरलची संपूर्ण रेंज आयात केलेल्या कॉन्सन्ट्रेटपासून तयार केलेली नसून ती भारतीय शेतकऱ्यांकडून मागवलेल्या भारतीय फळांपासून तयार केली आहे.
या विभागात वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने सादर करण्याच्या आपल्या निर्धाराला धरून या ब्रँडने भारतातील पहिली पॅकेज्ड अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसलेली प्रीमिअम फ्रुट बेव्हरेजेस पर्यावरणस्नेही रिसायकल करण्यासारख्या असेप्टिक पेट बॉटल्समध्ये सादर केली आहेत. या सदरीकरणप्रसंगी ITC लिमिटेडच्या डेअरी आणि बेव्हरेजेस विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. संजय सिंगल आणि ब्रँड अॅम्बेसेडर शिल्पा शेट्टी कुंद्रा उपस्थित होते.
भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेल्या लाँच रेंजमध्ये हिमालयन मिक्स्ड फ्रुट, रत्नागिरी अल्फॉन्सो आणि दक्षिण पिंक गुआवा यांचा समावेश आहे. ही फ्रुट ज्युसेस हिमालय, रत्नागिरी आणि दक्षिण कर्नाटक येथील फळांपासून तयार करण्यात आली आहेत. ही रेंज सर्व मॉडर्न ट्रेड आणि जनरल ट्रेड (किराणा दुकानांमध्ये) उपलब्ध असतील.
या सादरीकरणाच्या वेळी ITC लिमिटेडच्या डेअरी अँड बेव्हरेजेस विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. संजय सिंगल म्हणाले, "ही प्रोडक्ट रेंज वैशिष्ट्यपूर्ण आणि भारतीय फ्रुट बेव्हरेज उत्पादनांमध्ये उपलब्ध नसलेली अशी ही प्रोडक्ट रेंज आहे. सध्याचे ग्राहक आरोग्याबाबत सजग आहेत आणि पॅकेज्ड उत्पादनांमध्ये काय आहे, ते त्यांना जाणून घ्यायचे असते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा हा बी नॅचरलचा गाभा आहे. या गाभ्याला धरूनच आम्ही प्रीमिअम भारतीय फळांपासून तयार केलेली आणि असेप्टिक पेट बॉटल्स हे सर्वात आधुनिक सुरक्षित तंत्र वापरून पॅकेज केलेली फ्रुट बेव्हरेजेसची रेंज सादर करत आहोत. या रेंजमध्ये कोणतेही अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नाहीत याची खातरजमा केलेली आहे. ही पूर्ण रेंज आयात केलेल्या कॉन्सन्ट्रेटपासून तयार केलेली नसून भारतीय शेतकऱ्यांकडून घेतलेल्या फळांपासून तयार केली आहे, याचा ITC बी नॅचरलमध्ये आम्हाला अभिमान आहे. अभिनेत्री आणि वेलनेस प्रचारक शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणाल्या, "भारतीय ग्राहकांसाठी फ्रुज ज्युस उपभोगण्याच्या अनुभवाला अधिक सकारात्मक आकार देण्यासाठी बी नॅचरलतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल मी आनंदी आहे. आई म्हणून मला माझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम उत्पादने हवी असतात, म्हणून आम्हाला विश्वासार्ह ब्रँड हवे असतात. आपल्या स्वत:बद्दल, शेतकऱ्यांबद्दल सजग असलेल्यांसाठी हे नक्कीच एक सकारात्मक पाऊल आहे."बी नॅचरलची फ्रुज ज्युसेस भारतीय शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेल्या फळांपासून तयार केलेली असतात, त्या माध्यमातून भारतीय कृषी अर्थव्यवस्था बळकट करतात. भारताच्या फ्रुट सर्क्युलर इकोनॉमीला चालना देण्याच्या ब्रँडच्या निर्धाराला बळकटी देत पारदर्शक असेप्टिक पेट बॉटल्स रेंज ही उत्तम दर्जाच्या फुड प्लास्टिकपासून तयार करतात, जे रिसायकलिंग सुविधांसाठी पूर्णपणे कम्पॅटिबल आहे. तीन ज्युस व्हेरिअंट्स सामान्य दुकानांमध्ये आणि मॉडर्न किराणा दुकानांमध्ये, अग्रणी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील.
उत्पादनांची माहिती:
⁻ हिमालयन मिक्स्ड फ्रुटच्या ७५० मिलि आणि ३०० मिलिच्या बॉटल्स अनुक्रमे रु. ९९ आणि रु. ४० किमतीला उपलब्ध असतील.
⁻ रत्नागिरी अल्फॉन्सोच्या ७५० मिलि आणि ३०० मिलिच्या बॉटल्स अनुक्रमे रु. ११० आणि रु.४५ किमतीला उपलब्ध असतील.
⁻ दक्षिण पिकं गुआवाच्या ७५० मिलि आणि ३०० मिलिच्या बॉटल्स अनुक्रमे रु. ९९ आणि रु. ४० किमतीला उपलब्ध असतील.
ITC FOODS बद्दल:
ITCचा बँडेड पॅकेज्ड फूड बिझनेस हा एक अत्यंत वेगाने वाढणारा फूड बिझनेस आहे आणि ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड कंपनी आहे. या कंपनीच्या ब्रँड्समध्ये आशीर्वाद, सनफिस्ट, बिंगो!, यिप्पी!, किचन्स ऑफ इंडिया, बी नॅचरल, मिंट-ओ, कँडीमॅन आणि गमऑन या ब्रँड्सचा समावेश आहे. सध्याचा अन्नपदार्थ व्यवसाय हा बाजारातील विविध विभागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात प्रमुख अन्नधान्य, मसाले, रेडी-टू-इट, अल्पोपहाराचे पदार्थ, बेकरी व कन्फेक्शनरी आणि नव्याने सादर झालेले फळांचे रस व पेये हे प्रकार आहेत.
ITC फुड्सच्या ब्रँडतर्फे आपल्या वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांनी लाखो कुटुंबांना समाधानी करण्यात येते. ITCच्या स्वतःच्या संशोधन व विकास क्षमता, ग्राहकांबद्दल सखोल समज, भारतीयांना आवडणाऱ्या चवींची माहिती, कृषी-स्रोत व पॅकेजिंग ७मता आणि अतुलनीय वितरणाच्या जाळ्यामुळे हे शक्य झाले आहे. आपल्या ग्राहकांचे आरोग्य व सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या निर्धार असलेल्या ITCतर्फे उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि वितरण साखळीत उच्च दर्जा, सुरक्षा व सुरक्षा प्रमानकांचे पालन करण्यात येते. ITCच्या मालकीचे सर्व कारखाने हॅझार्ड अॅनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट (एचएसीसीपी) प्रमाणित आहेत. सर्व कारखान्यांच्या दर्जात्मक कामगिरीवर नियमित ऑनलाइन लक्ष ठेवण्यात येते. प्रक्रिया नियंत्रणाच्या पलिकडे जाऊन आपल्या उत्पादन प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या घटकांची निवड करताना दर्जा प्रमानकांचे इमानेइतबारे पालन करण्यात येईल याची खातरजमा ITCतर्फे करण्यात येते. या क्षेत्रातील प्रचंड संधी व देशातील सर्वात विश्वासार्ह बँडेड पॅकेज अन्नपदार्थ पुरवठादार होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उत्पादन, वितरण आणि मार्केटिंग या विभागांमध्ये या उद्योगातर्फे सतत गुंतवणूक करण्यात येते. ITC फुड बिझनेसतर्फे उत्तर अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्व आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपली उत्पादने निर्यात करण्यात येतात.