Monday, April 28, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेमुंबई चे राजे संघाचा तेलुगू बुल्सवर विजय

मुंबई चे राजे संघाचा तेलुगू बुल्सवर विजय

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

 इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीगमध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीत मुंबई चे राजे संघाने आपल्या पहिल्या सामन्यात तेलुगू बुल्स संघावर 34-33 अशा फरकाने विजय मिळवत चमक दाखवली.
  पुण्याच्या  बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईचे राजे व तेलुगु बुल्स संघात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या क्वॉर्टरमधील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सामना 7-7 असा बरोबरीत होता. तेलुगूच्या बचावफळीने मुंबईच्या दोन खेळाडूंना बाद करत क्वार्टरअखेरीस 9-7 अशी आघाडी घेतली.दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील अशीच चुरस पाहायला मिळाली. एक-एक गुणांसाठी दोन्ही संघातील खेळाडू मेहनत घेताना दिसत होते. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाच्या खेळाडूंनी चमक दाखवण्यास सुरुवात केली. विजय राजपूतने चढाईत चमक दाखवत मुंबई साठी गुणांची कमाई केली.त्यामुळे मध्यंतरापर्यंत मुंबई चे राजे संघाकडे 20-14 अशी आघाडी होती.
     तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये तेलुगू बुल्स संघाने जोर लावला.
त्यांच्या मनोज कुमार या चढाईपटूने गुण मिळवत मुंबईची आघाडी 23-19 अशी कमी केली.चौथ्या क्वार्टरमध्ये तेलुगू संघाने गुणांची कमाई करत सामन्यात चुरस निर्माण केली.तेलुगु संघाने गुणांची कमाई करत सामना 29-29 असा बरोबरीत होता.एकवेळ तेलुगु संघाकडे 32-30 अशी आघाडी होती.पण, मुंबईच्या चढाईपटूने एकत्र तीन खेळाडूंना बाद करत 34-32 अशी आघाडी घेतली.यानंतर तेलुगु संघाला केवळ एकच गुण मिळवता आला व मुंबईच्या संघाने अवघ्या एका गुणाने विजय मिळवला.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!