पिंपरी, प्रतिनिधी :
भिगवनच्या मच्छीची चव पिंपरी-चिंचवडकरांना चाखता येणार आहे. तसेच व्हेज आणि नॉनव्हेज चवदार जेवणाचा आस्वादही खवैयांना घेता येणार आहे.
चिंचवड-वाल्हेकरवाडी रस्त्यावर प्रशस्त जागेत हॉटेल पाटील पॅलेस सुरू झाले असून, याचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, उद्योजक शंकर जगताप, नगरसेविका करूणा चिंचवडे, आशा शेंडगे, हॉटेलचे संचालक बंडू मारकड, राकेश भरणे, राजेंद्र चिंचवडे, शेखर चिंचवडे, अजय दूधभाते, उद्योजक मनोजकुमार मारकड, सुरेश कांबळे, अरविंद पवार, अपर्णा डोके, सिद्धेश्वर बारणे, अनंत कोऱ्हाळे, माऊली सुर्यवंशी, सुर्यकांत गोफणे, अमोल थोरात, श्रीकांत धनगर, बाळासाहेब वाघमोडे, प्रविण काकडे, नगरसेविका प्रियांका बारसे, प्रेमकांत बोबडे, बिरू व्हनमाने, अभिमन्यू गाडेकर, महावीर काळे, काका मारकड, अजित चौगूले, अंबादास पडळकर, डॉ. दिनेश गाडेकर, अंकलेश सरोदे, संतोष मदने, संतोष काशीद, हंसराज बोबडे, दिपक भोजने आदी उपस्थित होते.
उद्घाटक आमदार लक्ष्मण जगताप याप्रसंगी म्हणाले, ‘आनंद लुटावा आणि आनंद वाटावा’, या उक्तीप्रमाणे हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आनंद मिळेल. हॉटेल पाटील पॅलेसमुळे पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात निश्चित भर पडेल. गोपीचंद पडळकर यांनी सांगितले, की तत्पर सेवा हा आजच्या युगाचा मंत्र आहे. बाहेरुन पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्या खवैयांनाही भिगवणच्या मच्छीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे हॉटेल पाटील पॅलेस लवकरच नावारुपास येईल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.