पुणे प्राईडचा बंगळूरु रायनोजवर 32-29 असा विजय

584

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

पिछाडीरुन पुणे प्राईड्स संघाने जोरदार कामगिरी करत  इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बंगळूरु रायनोज संघाला 32-29 असे पराभूत केले. मध्यंतरापर्यंत पुण्याचा संघ पिछाडीवर होता. पण, खेळाडूंनी चांगली कामगिरी करत पुण्याला विजय मिळवून दिला.     पुण्याच्या बालेवाडी येथे सुरु असलेल्या या सामन्यात बंगळूरु रायनोज संघाने पुणे प्राईड संघाविरुद्ध आक्रमक सुरुवात करत केली. बंगळूरु रायनोजच्या चढाईपटूंनी सामन्याच्या पहिल्याक्वॉर्टरमध्ये चांगली कामगिरी करत संघाला 12-1 अशी आघाडी मिळवून दिली.   दुसऱ्याक्वॉर्टरमध्ये यजमान पुण्याच्या संघातील खेळाडूंनी गुण मिळवले. पुण्याच्या खेळाडूंनी गुणांची कमाईकेली. अब्दुलच्या चढाईमुळे पुण्याने दुस-या क्वॉर्टरमध्ये 13-6 अशी बाजी मारली. पण, मध्यंतरापर्यंत बंगळूरु रायनोज संघाकडे 18-14 अशी आघाडी होती.

       सामन्याच्या तिस-या क्वॉर्टरमध्ये पुण्याच्या संघाने गुणांची कमाई केली. दोन्ही संघांनी या क्वॉर्टरमध्ये 6-6 गुण मिळवली तरीही क्वॉर्टरअखेरिस बंगळूरुकडे 24-20 अशी आघाडीघेतली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावला.पुण्याच्या चढाईपटूंनी जोरदार कामगिरी करत संघाला आघाडी मिळवून देत सामन्यात पुनरागमन केले. खेळाडूंनीगुणांच्या कमाईत सातत्य ठेवत आघाडी 30-26 अशी  केली.  यानंतर बंगळूरुने काही गुण मिळवत चुरस आणली पण, अखेर पुण्याच्या संघाने बाजी मारली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये पुणे च्यासंघाने 12 गुणांची कमाई केली.

……………………………..