सासवड, प्रतिनिधी,
पुरंदर तालुक्यात अत्यंत दुष्काळ पडला आहे.पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावातील नागरिकांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.थापेवाडी येथील ग्रामस्थ पत्रकार म्हस्कू खवले यांनी स्वतःच्या शेतात बोरवेल मारून गावातील नागरिकांची तहान भागवली आहे.त्यांच्या या कार्याबदल अनेकांनी कौतुक केले आहे.
पुरंदर तालुक्यात दुष्काळामुळे अनेक गावातील नागरीकांना दुर अंतरावरापर्यंत भटकती करावी लागत आहे. दिड ते दोन हजार लोकसंख्या असणा-या थापेवाडी गावातील पत्रकार म्हस्कू खवले यांनी मनात निश्चय केला काहीही करून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची असे ठरवले.टॅकरने रोज पाणी पुरवठा करणे मोठ्या खर्चाचे होते.ते शक्य नसल्याने त्यांनी गावातील माजी सरपंच रोहित खवले,ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यांच्या मार्गदर्शनाने स्वतच्या शेतात स्वखर्चाने बोरवेल मारले असता काही प्रमाणात पाणी लागले आहे.यावेळी ग्रामस्थ गणेश खवले,महादुनाना खवले,ॠषीकेश खवले,सुनिल खवले,कांताआबा खवले,सुभाष खवले,मामा जगताप यांचे सहकार्य लाभले. त्यातील पाणी टॅक्टरने गावात वाटप करण्यासही कोणी मिळत नसल्याने म्हस्कू खवले यांनी शेतातच प्लास्टिकची पाण्याची टाकी ठेवली आहे.टाकीला नळ बसविण्यात आले आहे.पाण्याच्या टाकीत रोज पाणी भरण्यात येते.गावातील ग्रामस्थ आपल्या दुचाकीवर व बैल गाडीत कॅनमधून पाणी घेऊन जात आहेत.पिण्यासाठी पाणी मिळाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.