पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या यासामन्यात मुंबई चे राजे संघाने चांगला खेळ केला. पहिल्याक्वार्टरमध्ये दिलजीत सिंह चौहान व करमबिर यांच्या चढाईच्याजोरावर मुंबईने चेन्नई चॅलेंजर्स विरुद्ध 8-5 अशी आघाडीघेतली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नई संघाकडून देखील चांगलाखेळ झाला.इलायाराजाने चढाईत चुणूक दाखवत गुण मिळवले त्याला धनराज व राजेश धीमन यांनी बचावात साथदिली. दुसरे क्वॉर्टर 8-8 असे बरोबरीत राहिले असले तरीहीमध्यंतरापर्यंत मुंबई चे राजे संघाकडे 16-13 अशी आघाडीहोती.
मुंबई चे राजे संघाकडे आघाडी होती पण ती नाममात्र होतीत्यामुळे त्यांना भक्कम आघाडीची गरज होती. तिसऱ्याक्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाने आपला खेळ आक्रमककेला.चेन्नईच्या चढाईपटू विशेष करू करून इलायाराजाने गुणमिळवत संघाच्या गुणसंख्येत भर घालणे सुरुच ठेवले.मुंबईच्यारवी देसवाल व राशीद शेख यांनी बचावात चुणूक दाखवततिसरे क्वॉर्टर 12-8 असे जिंकत संघाची आघाडी 28-21 अशी केली. शेवटच्या क्वार्टरमध्ये चेन्नईच्या संघाचे आघाडीकमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.चेन्नईकडून नामदेवइसवलकरने अष्टपैलू कामगीरी करत चेन्नईला मुंबईच्यागुणसंख्येच्या जवळ आणले. शेवटच्या मिनिटापर्यंत सामन्यातकाय होईल याची उत्सुकता सर्वांना होती.मुंबईच्या मनिविराकांथाला शेवटच्या चढाईत सुरेश कुमारने बाद करत सामनाबरोबरीत आणला.
…………
मुंबई चे राजे, चेन्नई चॅलेंजर्स सामना 34-34 असा टाय
मल्हार न्यूज, पुणे,
: पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत चेन्नईचॅलेंजर्स संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतमुंबई चे राजे विरुद्ध सामना 34-34 असा टाय केला. या लीगस्पर्धेतील हा पहिलाच टाय सामना ठरला. सामन्यात मुंबई चेराजे संघाकडे आघाडी असून देखील शेवटच्या क्वॉर्टरमध्येचेन्नईच्या संघाने जोरदार खेळ करत सामना टाय राखण्यातयश मिळवले.