मल्हार न्यूज (ऑनलाईन) पुणे, सुनील जयपाल व नवीन यांच्या चढाया तर, बचावात प्रदीप व मनिष यांच्या कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत दिलेर दिल्ली संघाने चेन्नईचॅलेंजर्सवर 49-37 असा विजय मिळवला.चेन्नई संघाकडून इलायाराजा व रजत राजू बोबडे यांनी चढाईत छाप पाडली तरीही संघाचा पराभव त्यांना टाळता आला नाही. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे पार पडलेल्या लढतीत दिलेर दिल्ली व चेन्नई चॅलेंजर्स संघामध्ये चांगली चुरस पहायला मिळाली.दोन्ही संघातील खेळाडूंचा गुण मिळवण्यासाठीचांगलाच कस लागत होता. पण, पहिल्या क्वॉर्टरमध्ये दिलेर दिल्लीला 10-9 अशी नाममात्र आघाडी मिळवण्यात यश मिळाले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील दिलेर दिल्ली संघाने आपला हाचफॉर्म कायम ठेवला. चेन्नई संघाकडून सुनील कुमार व नामदेव इसवलकर यांनी चमक दाखवत संघाच्या गुणसंख्येत भर घातली.पण, दिल्लीच्या खेळाडूंनी गुण मिळवत दुसरे क्वार्टर 11-8असे नावावर करण्यासोबत मध्यंतराला 21-17 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नई संघाकडून आघाडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. चेन्नईकडून रजत राजू बोबडेने चढाईत गुणांची कमाई केली. पण, दिल्लीचे खेळाडू देखील त्यांच्याचालींना चांगले प्रत्युत्तर देत होते. अखेर चेन्नईच्या संघाने तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये 15-14 अशीबाजी मारली पण, दिल्लीच्या संघाला 35-32 अशी आघाडी घेण्यात यश मिळाले. चौथ्याक्वॉर्टरमध्ये देखील एक- एक गुणासाठी दोन्ही संघातील खेळांडूंचा कस लागत होता. पण, सुनील जयपाल व नवीनने चढाईत जोरदार कामगिरी करत मोठी आघाडी संघाला मिळवुन दिली वशेवटच्या क्वॉर्टरमध्ये 14-5 अशी आघाडी घेत सामना खिशात घातला.