मतमोजणी दिवशीचे वाहतुकीचे नियमनाची तयारी पूर्ण

1203

मल्हार न्यूज, (ऑनलाइन)

 – पुणे जिल्हयामधील मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुलामध्ये दि.23 मे 2019 रोजी होणार आहे.  या दिवशी करण्यात येणा-या वाहतुकीचे नियमनाची तयारी पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. त्याविषयी राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना  तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्याकरीता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

           या बैठकीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अति.आयुक्त दिलीप गावडे,            उप जिल्हाधिकारी संदीप निचित, पिंपरी-चिंचवड परिमंडल-2 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त  (प्रशासन) श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक ( वाहतूक) किशोर म्हसवडे आदी अधिकारी उपस्थित होते.

          यावेळी पोलीस प्रशासनाकडून उपस्थित राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या दिवसाची वाहतुकीविषयी माहिती देताना कोणत्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कोणत्या ठिकाणी आपली वाहने पार्क करता येईल याबाबतची माहिती देवून   मतमोजणीकरीता उपस्थित राहणा-या सर्वच अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या वाहनांना  ओळखपत्र पाहून मुख्य दरवाज्यातून सकाळी 7 वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. तसेच ओळखपत्राशिवाय आत सोडले जाणार नाही व एकदा आत सोडल्यानंतर बाहेर जाताना त्याचे ओळखपत्र जमा करण्यात येवून पुन्हा त्यांना आत सोडले जाणार नाही.तसेच मतमोजणी केंद्रात कोणालाही मोबाईल नेण्यास बंदी असल्याची   माहिती  यावेळी देण्यात आली