महाराष्ट्र राज्य पुरस्कार सन्मान सोहळा पुण्यात रंगला 

743

मल्हार न्यूज(ऑनलाइन)

आर व्ही सहज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र राज्य पुरस्कार सन्मान सोहळा “गौरव कलेचा उत्सव नात्यांचा हा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने नटलेला एक आगळा वेगळा पुरस्कार सोहळा साजरा झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संजयजी भोकरे संघटक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, आय बी न लोकमत चे रणधीर कांबळे , विजय शेवाळे, ऑल इंडीया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मोरे, संजय चोरडिया, मनीष आनंद, ओम तरवडे, आयोजक राहुल व्यवहारे, माधवी व्यवहारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आता पर्यंत आपण बरेच पुरस्कार पहिले असा आगळा वेगळा पुरस्कार सोहळा ५ वर्षे पूर्ण होऊन दिमाखदार सोहळ्याचे आयोजन कारण्यात आले होते. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्य व यश संपादन केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक व विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा आणि विविध कलाक्षेत्रातील कलाकारांचा सन्मान झाला.
या कार्यक्रमात चला हवा येऊ द्या, सारेगमप, या कार्यक्रमाची टीम हजेरी लावली. तसेच सिने क्षेत्रातील बरेच कलाकार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. बहारदार लावणी नृत्य सादर केले. तसेच दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता अभिनय बेर्डे, काश्मीरा परदेशी, कुशल बद्रीके, योगेश सिरसाट, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, गायक सावनी रवींद्र, रमेश परदेशी तसेच अनेक चित्रपटाच्या टीम ने हजेरी लावली.
आर व्ही सहज चॅरिटेबल ट्रस्ट गेले ५ वर्षे सातत्याने समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे तसेच कला क्षेत्रामध्ये आपले योगदान देणाऱ्या कलाकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करतात. तसेच संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य अनाथ मुलांना सहकार्य तसेच गोरगरीबांना मार्गदर्शन व त्यांच्या मूलभूत गरजा पुरवण्याचे काम ट्रस्ट च्या माध्यमातून होत आहे गेली पाच वर्षात अंध अपंग ग्रस्त मुलाना औषधे वाटप जेवण देत असतात रस्त्यावरील बेघर, अनाथ अपंगांना थंडी मध्ये ब्लॅंकेट कपडे वाटप जेवण वाटप करत असतात या ट्रस्ट च्या कार्यक्रमा बाबत प्रामाणिक उद्धेश जे काही या कार्यक्रमातून देणगी स्वरूपातून आर्थिक मदत मिळेल ते आम्ही वंचित शेतकरी पाणी प्रश्न असो या मध्ये ते खर्च करणार आहोत. कार्यक्रमाचे आयोजक राहुल व्यवहारे व माधवी व्यवहारे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले

पुरस्कारार्थी ची नावे
श्रीमती सुवर्ण सुरेंद्र आनंद – आदर्श माता
आर जे बंड्या – गौरव माध्यम कलेचा
राजेंद्र मोहिते – गौरव गुरु कलेचा
तानाजी जाधव – गौरव युवा नेत्रत्व कलेचा
विठ्ठल जाधव – गौरव मित्र कलेचा
संग्राम मुरकुटे – गौरव सन्मान कलेचा
योगेश मालखे – गौरव समाजसेवा कलेचा
संस्कृती बालगुडे – गौरव अभिनय कलेचा
मानसी मुसळे – गौरव सन्मान कलेचा
रुपाली निलेश चाकणकर – गौरव स्त्री शक्ती कलेचा
संजय मराठे – गौरव सन्मान कलेचा
अरुण गायकवाड – गौरव सन्मान कलेचा
आकाश कुंभार – गौरव छाया चित्र कलेचा
आर्य घारे – गौरव बाळ कलेचा
श्रीश खेडेकर – गौरव बाल कलेचा
प्रसाद नकाडी – गौरव उद्यम कलेचा
रईज खान – गौरव सूर कलेचा
डॉ. शैलेश मोहिते – गौरव संजीवन कलेचा
तृप्ती खामकर – गौरव हस्त कलेचा
निखिल राऊत – गौरव नाट्य कलेचा
शुभांगी तांबाळे – गौरव सन्मान कलेचा
अक्षय शहापूरकर – गौरव रंग कलेचा
योगेश चव्हाण – गौरव कलाक्रीडा कलेचा
आशा आगलावे – गौरव सन्मान कलेचा
सिया पाटील – गौरव सन्मान कलेचा
तेजा देवकर — गौरव सन्मान कलेचा
विजय पटवर्धन – गौरव सन्मान कलेचा
विजय कदम – गौरव सन्मान कलेचा
कॅरमल केक शॉप – गौरव सर्वोकृष्ट कार्य कलेचा
चार्ली स्टुडीओ – गौरव सन्मान कलेचा
योगिता सणस – गौरव व्यक्तिमत्व प्रशिक्षण कलेचा
पुष्कर जोग – गौरव अभिनय कलेचा
किरण कुमावत – गौरव युवा उद्योजक कलेचा
साईबा अमृततुल्य – गौरव सर्वोकृष्ट कार्य कलेचा
कृष्णप्रिया नायर – गौरव सन्मान कलेचा
मुळशी पॅटर्न – सर्वोकृष्ट चित्रपट
स्वामींनी बाउन्सर – गौरव सौरक्षण कलेचा
सुवर्णा काळे – गौरव सन्मान कलेचा
मंदार जोशी – गौरव कायदे तज्ञ कलेचा