मल्हार न्यूज (ऑनलाईन)
अमरजित सिंग याची चढाईत तर, जसकीरत सिंग व संदीप खरब यांनी बचावफळीत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत पुणे प्राईड संघाने बंगळूरुरायनोजवर 40-33 असा विजय मिळवला. पुणे प्राईड संघाचा हा सलग पाचवा विजय आहे. पराभूत बंगळूरु संघाकडून वैभव कदम, विपिन मलिक व अरुमुगुम यांनी चांगला खेळ केला. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या क्वॉटरमध्ये बंगळूरु रायनोज संघाने आपल्या चढाईपटूंच्या जोरावर 9-8 अशी एका गुणाची आघाडी घेतली. दुस-या क्वॉर्टरमध्ये पुणेप्राईड संघातील खेळाडूंनी चमक दाखवली. अमरजित सिंग, संदीप खरब, जसकीरत सिंग यांनी गुणांची कमाई करत दुस-या क्वॉर्टरमध्ये 9-6 अशी बाजी मारत मध्यंतरापर्यंत 17-15 अशी दोन गुणांचीआघाडी घेतली. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये बंगळूरु बुल्स संघाचे आघाडी घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण, पुणे प्राईड संघाकडून बंगळूरुला सहजासहजी गुण मिळवण्यास देत नव्हते. दोन्ही संघांच्या बचावफळीने चांगला खेळदाखवला. त्यामुळे तिसरे क्वॉर्टर 8-8 असे बरोबरीत राहिले. पण, पुण्याच्या संघाला सामन्यात 25-23 अशी आघाडी घेण्यात यश मिळाले. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये देखील दोन्ही संघांमध्ये गुणांसाठी चांगलीचुरस ही पहायला मिळाली. पण, पुणे प्राईडच्या अमरजित सिंह व संदीप खरबने चांगली कामगिरी करत शेवटच्या क्वॉर्टरमध्ये 15- 10 अशी चमक दाखवत विजय मिळवला.